Pages

Sunday, July 7, 2013

कुसंग, व्यसन, सिनेमामुळे युवा वर्ग बिघडला: भगवानभाई

कुसंग, व्यसन, सिनेमामुळे
युवा वर्ग बिघडला: भगवानभाई






चोपडा: आजचा युवावर्ग हा उद्याचा भावी समाज आहे. परंतु आजच्या युवा
वर्गाला कुसंग, व्यसन, सिनेमा याची किड लागल्यामुळे युवा वर्ग हा बिघडत
चालला आहे, असे प्रतिपादन माउंट आबू राजस्थान वरुन आलेले प्रजापिता
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे राजयोगी ब्रह्मकुमार भगवानभाई
यांनी प्रतिपादन केले. ते महात्मा गंधी माध्यमिक विद्यालयामध्ये 'छात्र,
छात्रांना जीवनामध्ये नैतिक शिक्षणाची गरज' विषयावर बोलत होते.

भगवानभाईंनी सांगितले की, आजच्या सामाजिक सर्व समस्यांचे मूळ कारण म्हणजे
नैतिक मूल्यांची कमतरता; ते सर्व विद्यार्थ्यांना म्हणाले की, तुम्ही
समाजामध्ये जाण्याच्या पूर्वी भौतिक शिक्षणाबरोबर नैतिक शिक्षण घेणे
सुध्दा गरजेचे आहे. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नैतिक शिक्षणाचा पाठ
शिकला नाही तर मग शिक्षण घेऊन सुध्दा जीवन अंधकारमय राहिल, असे म्हणायला
काही हरकत नाही. जीवनाला खर्या अर्थाने सुखमय बनवायचे असेल तर मग नैतिक
शिक्षण गरजेचे आहे. ते म्हणाले की, अनैतिकतेचे जीवन क्षणभरासाठी सुखाचे
झाले तरी त्याचा शेवट मात्र वाईट असतो. नैतिकतेद्वारे जीवन सुरुवातीला
कष्टकारी असते परंतु त्याचा शेवट मात्र चांगला असतो. ते म्हणाले की
युवावर्गामध्ये खूपच रचनात्मक शक्ति आहेत. युवा वर्गाला चागली दिशा
द्यावयाची असेल तर मग आध्यात्माचा आधार घेणे गरजेचे आहे. आध्यात्मामुळे
युवकांना चांगला मार्ग मिळू शकेल. भगवानभाई म्हणाले की, आता शिक्षणाबरेबर
विद्यार्थ्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीचे बीजरोपण करणे गरजेचे आहे. ते
म्हणाले की, समाज नैतिक मूल्यांमुळे चालतो. नैतिक मूल्यांचा र्हास आपण
थांबविला नाही तर भौतिक शिक्षण असून सुध्दा समाजामध्ये विकृती येतील,
मूल्यांची जोपासना करुन स्वत:ला चरित्रवान बनविणे शिक्षणाचे हेच उद्दीष्ट
आहे. आजची मुले उद्याचा भावी समाज आहे. शाळेतूनच समाजाच्या प्रत्येक
वर्गात मुलं जातात. भावी समाजाला सुदृढ किंवा सशक्त बनवायचे असेल तर
मुलांना नैतिक शिक्षण देणे गरजेचे

आहे.
अखिल भारतीय नैतिक शिक्षणाच्या अभियानाचे उद्देश स्पष्ट करून त्यांनी
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बद्दल सविस्तर माहिती दिली.
मुख्याध्यापकांनी सुध्दा अशावेळी आपले प्रबोधन दिले. ते म्हणाले की, आजचे
विद्यार्थी उद्याचा समाज आहे, उद्याचा समाजाला चांगले बनविण्यासाठी
विद्यार्थ्यांमध्ये नीतीमत्ता असणे गरजेचे आहे. स्थानिक राजयोग
सेवाकेद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी मंगला बहन ने सुध्दा मुलांना
आपल्या शुभ भावना अर्पित केल्या. या कार्यक्रमामध्ये बी.के.भाई बहणे
सुध्दा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment