Pages

Sunday, July 7, 2013

सकारात्मक विचारांनाच आपले बनवू शकतो.

गोंदिया, ९ ऑक्टोबर
१९ व्या शतकात अंदाजपूर्वक
होती, २० वे शतक प्रगतीशिल होते.
परंतु, आता २१ व्या शतकात युग हे
तणावपूर्वक राहील. अशा तणावपूर्ण
परिस्थितीत स्वतःला तणावापासून दूर
ठेवण्यासाठी सकरात्मक विचारांची
गरज आहे. आजघडीच्या समस्यामयी
युगात आपल्याला तणावमुक्त
ठेवण्यासाठी सकारात्मक विचाराने
तणावमुक्ती मिळेल, असे प्रतिपादन
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय
विश्वविद्यालय माऊंट अबू येथून
आलेले राजयोगी बी. के. भगवानभाई
यांनी केले. ते स्थानिक ब्रह्मकुमारी
राजयोग केंद्रात आयोजित कार्यक्रमात
मार्गदर्शन करताना भगवानभाई तर मंचावर उपस्थितांमध्ये
त्रिलोक बग्गा व अन्य
बोलत होते.
पुढे बोलताना भगवानभाई यांनी
सांगितले की, सकारात्मक विचार
करणाराच मानसिक, शारीरिक रुपाने
निरोगी राहू शकतो. नकारात्मक
विचारच अनेक समस्या आणि
आजाराचे कारण बनत असतात. आज
वर्तमानकाळात सहनशक्तीची अत्यंत
आवश्यकता आहे. कोणतेही दुःख,
कष्ट सहन करणे फार कठीण असते
परंतु, त्याचा शेवट हा गोड असतो.
महापुरुषांनी आपल्या सहनशक्तीच्या
आधारावर महानता प्राप्त केली आहे.
गीतेत दिलेले महाकाव्यात असे
सांगितलेले आहे की, जीवनातील
प्रत्येक घटना ही कल्याणकारी आहे. ही
घटना होऊन गेली, ती कल्याणकारी
होती. जी घटना वर्तमान काळात घडत
आहे ती देखील कल्याणकारीच आहे.
जे काही होणार त्यात कल्याणच
होणार, मग चिता किवा तणाव
करण्याची काय आवश्यकता. दुसरयाचे
अहित करणारा व्यक्ती कधीही सुखी
राहू शकत नाही. न्यूटनच्या गतीच्या
नियमाबाबत सांगताना म्हणाले की,
एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत
चूकीचा व्यवहार केल्यास आपणही
त्यासोबत तसाच व्यवहार करू नये.
मानवी मूल्यांची कमतरता हीच
सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक व
पर्यावरणाच्या मूळ समस्यांचे कारण
आहे. भविष्याच्या नाजुक वेळी
स्वतःला सुखी बनविण्यासाठी
सकारात्मक विचारांची आवश्यकता
आहे. सत्संगाच्या माध्यमातूनच आपण
सकारात्मक विचारांनाच आपले बनवू
शकतो.
सत्संगातून मिळालेले ज्ञान हीच
आपली खरी कमाई असते. जीवनात
येणारया अडचणीच्या वेळी पुण्यकर्मच
आपल्याला मदत करीत असते.
यावेळी ब्रह्मकुमारी राजयोग केंद्राच्या
संचालिका ब्रह्मकुमारी रत्नमाला बहन
यांनी राजयोगाचे महत्त्व समजावून
सांगितले. यावेळी प्रामुख्याने
त्रिलोकचंद बग्गा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment