स्त्री जन्माच स्वागत करणार एक अनोखं गाव - तळेवाडी
स्त्री जन्माच स्वागत करणार
तळेवाडी ता. आटपाडी .......! जिल्याच्या नकाशावर असलेलं पण फारसं परुचीव
नसलेलं तीन हजार लोकसंख्येचं गाव तस पाहिलं तर गावाला ना ऐतिहासिक वारसा ना
अभिमानानं सागावी अशी ओळख. नाही म्हणायला जुनी जाणती लोकं म्हणतात,
‟श्रावणबाळाचा मृत्यु याच गावात एका तळ्याशेजारी झालाˮ.त्याच्या नावानं
असलेलं ‟ श्रावणबाळातचतळ ˮ त्यावरुनच गावाच नाव
तळेवाडी पडलं एवढाच काय ती ऐतिहासिक ओळख अस हे लहानस खेड प्रकाशझोतात आलं
ते 2001 साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात याच गावान जिल्ह्यात
तृतीय क्रमांक मिळवुन आपल्या कार्यकर्तुत्वाची ओळख पटवुन दिली. यशाची
हीच परंपरा कायम ठेवतं 2010 साली गावाने ‟ निर्मल ग्राम ˮ हा
पुरस्कारही मिळवला. तस पाहील गेल तर गावात गेल्या 28 वर्षापासुन विठूनामाचा
गजर अखंडपणे होतो आहे . दरवर्षी नृसिंह जयतीला गावाक अखंड हरिनाम सप्ताहाच
आयोजन केलं जातं. जवळ पास अर्धआधिक गाव वारकरी अक्षयतृतीयेला होणारा
ग्रामदैवत सिध्दनाथाचा उत्सव आणि दिवळी पाडव्याला होणारा संस्कार
व्याख्यानमाला हे या गावाचे सामाजिक आणि वैचारीक उत्सव, अशाच वैचारीक
प्रगल्भतेतून गावाचे हौशी तरुणानी आणि ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या
मदतीने एक क्रांतीकारी योजना सुरु केली. सामाजिक आणि ‟ स्त्री जन्माच
स्वागत ˮ. अर्थात राजमाता जिजाऊ लखपती कन्या कल्याण योजना !